धाराशिव शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था; नागरिकांचा संताप शिगेला

Spread the love

7 ऑगस्ट रोजी रास्ता रोकोचा इशारा!

धाराशिव – धाराशिव शहरातून जाणाऱ्या बार्शी-औसा राज्यमार्ग व जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान मंदिर या दोन्ही प्रमुख रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. संबंधित यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी 7 ऑगस्ट रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शहरातील बार्शी ते औसा हा राज्यमार्ग, जो जिजाऊ चौक ते भवानी चौक सांजा रोडपर्यंत जातो, सध्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. या मार्गालगत शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये असल्यामुळे प्रचंड वर्दळ असते. मात्र रस्त्यावर पावसाचे पाणी साचून खडी उखडली असून, खड्ड्यांमुळे अनेकजण अपघातग्रस्त होत आहेत. दुर्दैवाने एका तरुणाचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक कायमचे अपंग झाले आहेत.

विशेष म्हणजे या रस्त्याच्या काम महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (मुंबई) यांच्यामार्फत ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी कंत्राटदाराशी करार करून मंजूर झाले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी भूमिपूजनही केले होते. परंतु या कामाला नऊ महिने झाले तरी अद्याप सुरुवात झालेली नाही. वाहनचालकांना मणक्याचे विकार जडत आहेत, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे व मानसिक त्रास वाढला आहे.

त्याचप्रमाणे, जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान मंदिर (नितीन आदमिले ते लाटे घर) हा सीसी रस्ता २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नगर परिषदेने मंजूर करून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिलेला आहे. हे काम ३०० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित होते, पण साडेतीन वर्षांनंतरही काम सुरू झालेले नाही. या रस्त्याची अवस्था सुद्धा भयावह असून नागरिकांना तेच हाल सहन करावे लागत आहेत.

या दोन्ही रस्त्यांच्या कामांना तातडीने सुरुवात करावी, अन्यथा ७ ऑगस्टपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ठाम इशारा खालील नागरिकांनी दिला आहे
या निवेदनावर शहाजी भोसले, प्रशांत पाटील, विनोद वीर, दौलत निपाणीकर, संतोष हंबीरे, रवी वाघमारे, शेखर घोडके, उमेश राजेनिंबाळकर, रोहित बागल, सोमनाथ गुरव, सिद्धार्थ बनसोडे, बाबा मुजावर, तुषार निंबाळकर, मिनिल काकडे, आदित्य पाटील, अभिराज कदम, राणा बनसोडे, महादेव माळी, शौकत शेख, राकेश सुर्यवंशी, बंडू आदरकर, पंकज पाटील, सुमित बागल, पंकज भोसले, धवलसिंह लावंड, अभिषेक बागल, अक्षय खळदकर, नाना घाटगे, अमित उंबरे, जयंत देशमुख, सुरज वडवले, सह्याद्री राजेनिंबाळकर, ॲड. तनुजा हेड्डा, मनोज उंबरे, कालिदास शेरकर, प्रदीप घुटे, विजय माकरवार, दत्तात्रय गोरे, शेषेराव दुधनाळे, एम.बी. बनजगोळे, वैजीनाथ नरुणे, प्रेमानंद सपकाळ, ऋषी राऊत, अजिंक्य हिबारे, सतीश लोंढे, विनोद केजकर, शहाजी पवार, अतुल खराडे, हर्षद ठवरे, तौफिक काझी, अबरार कुरेशी, सात्विक दंडनाईक आदी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

  • Related Posts

    शहरातील 140 कोटींच्या रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करा; कचरा डेपो हलवा – महाविकास आघाडीचा पालकमंत्र्यांना इशारा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या १४० कोटींच्या मंजूर कामांना तात्काळ सुरुवात करावी, तसेच शहरालगत असलेला कचरा डेपो अन्यत्र हलवावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आमदार कैलास पाटील…

    पथदिव्यांच्या पोलवरील होर्डिंगचे सांगडे काढण्यास नगरपालिका धजना

    Spread the love

    Spread the loveसांगडे जैसे थेच… डिजिटल बॅनरपासून शहराचे होणारे विद्रूपीकरण थांबवण्याचे नगरपालिकेचे आश्वासन? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची धाराशिव नगरपालिकेकडून पायमल्ली धाराशिव : शहराच्या मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांच्या पोलवर अनधिकृतपणे बसवलेले बॅनर सांगडे आजही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *