खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; अनाथ मुलांपासून रक्तदात्यांपर्यंत माणुसकीचा स्पर्श

Spread the love

सेवेचा संकल्प — खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसाचे अनोखे रूप; रक्तदान, मदतीचा हात, आणि वंचितांसोबत साजरा

धाराशिव – धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा वाढदिवस यंदाही समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ‘नेतृत्व हे केवळ पद नसून सेवा’ हे तत्त्व पाळत राजेनिंबाळकर यांच्या कार्यशैलीला अनुसरून शिवसेना व युवासेनेच्या वतीने विविध उपक्रमांची प्रभावी रचना करण्यात आली.

धाराशिव शहरातील खासदार संपर्क कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरास नागरिक, तरुण, कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केले गेले. अनेकांनी ‘वाढदिवसाचा खरा अर्थ समाजासाठी योगदान’ या भावनेतून रक्तदान केले.

त्यानंतर धाराशिव येथील अंकुर शिशूगृहातील निराश्रित मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते संस्थेला २१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. या उपक्रमात माणुसकीचा जिव्हाळा प्रकर्षाने जाणवला.

या दिवशी धाराशिवच्या शासकीय स्त्री रुग्णालयात १७ जुलै रोजी जन्मलेल्या बालकांना खास ड्रेस देण्यात आले, त्यांच्या मातांना साडी-चोळी आणि खाऊ वाटण्यात आले. मातृत्वाचा सन्मान आणि नवजात बालकांचा आनंद या उपक्रमात प्रतिबिंबित झाला.

या सर्व कार्यक्रमांमध्ये शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख विजय बापू सस्ते, जिल्हा सचिव प्रविण कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख रवि वाघमारे, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ आप्पा गुरव,विधान सभा अध्यक्ष शौकत (भाई) शेख,अतिश पाटील, युवासेना तालुका प्रमुख राकेश सुर्यवंशी, नगरसेवक बाळासाहेब काकडे, रोहित निंबाळकर,तुषार निंबाळकर, सिध्देश्वर कोळी,राणा बनसोडे, रवि कोरे आळणीकर,निलेश शिंदे, सुनिल वाघ, युवासेना शहरप्रमुख अभिजित कदम, उपशहरप्रमुख बंडू आदरकर,दिपक जाधव,जावेद काझी,मनोज उंबरे,अकबर कुरेशी, अमित उंबरे, अँड मनोज शेरकर, मिलिंद पेठे,नाना घाडगे,पंकज पडवळ,गणेश साळुंखे, अविनाश शेरखाने, सतिश लोंढे,मुजीब काझी,पांडू भोसले, हनुमंत देवकते,संकेत सुर्यवंशी, नवज्योत शिंगाडे,साबेर सय्यद,कलीम कुरेशी,शिवराज आचार्य,अशोक पेठे,मोईन पठाण, पांडूरंग माने,राज निकम,कालिदास शेरकर,पिंटू अंबेकर,अक्षय जोगदंड, नितिन राठोड,सुयोग शिंदे,लाला पवार,गफूर शेख,बिलाल कुरेशी, प्रदिप साळुंखे, प्रविण शेंदारकर,महेश लिमये, रवि वाघमारे,बबलू कोकाटे,यशवंत शहपालक,सात्विक दंडनाईक,अभिजित साठे, यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी आदींचा समावेश होता.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नावावर साजरा झालेला हा वाढदिवस म्हणजे सेवेचा उत्सव, माणुसकीचा साज, आणि वंचितांच्या आयुष्यात प्रकाश टाकणारा एक दिवस ठरला.

  • Related Posts

    पात्र अतिक्रमण धारकांनाही आता घरकुल मिळणार

    Spread the love

    Spread the loveजागेचे पट्टे मिळवून घेण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन धाराशिव – प्रधानमंत्री आवास योजना टप्पा -२ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात नवीन ७५ हजार घरकुल मंजूर आहेत. मात्र यातील अनेक…

    पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देशभरात सुरू झाले असून, धाराशिव जिल्ह्यासाठी ७५ हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *