
नक्षलग्रस्त भागात विकासाचा नवा मार्ग, दळणवळणासोबत विश्वासही
गडचिरोली – स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम ‘मरकणार’ ते ‘अहेरी’ मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा केवळ प्रवासाचे साधन नाही, तर विकास, संवाद आणि विश्वासाचा सेतू ठरणार आहे.
या उपक्रमासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने घेतलेली मेहनत, तसेच स्थानिक जनतेचे सहकार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. या ऐतिहासिक टप्प्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे, असे मत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेप्रमाणे “नक्षलमुक्त भारत” दिशेने उचललेले एक ठोस पाऊल असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.
या सेवेचा शुभारंभ हा केवळ वाहतूक सेवा सुरू करणे नाही, तर विस्थापित आणि दुर्लक्षित भागांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. आता या भागातील विद्यार्थी, नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अधिक चांगल्या संधी मिळणार आहेत.