
तुळजापूर – राज्यातील कष्टकरी, शेतकऱ्यांसह सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना आई जगदंबे चरणी केली. तसेच या ठिकाणी मंदिर परिसरात पर्यावरण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. सिंगल युज प्लास्टिक टाळण्याचे आवाहन तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
याप्रसंगी पर्यावरण विभागाचे अधिकारी तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांसोबत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.