
धाराशिव (प्रतिनिधी) -: पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार पोह/1431 गादेकर, पोह/1459 शिंदे, पोना/1631 ढगारे, पोअं/1029 कोळी, चालक पोह/67 घुगे असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता रवाना होवून बेंबळी पॉईट येथे थांबले असता पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन इसम चोरीचे केबल/वायर जाळून आणुन त्याचे तांब्याची तार विकणार आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी गेले असता पथकास दोन इसम मिळून आले. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे नाव- विशाल शाम जाधव, वय 20 वर्षे, व विधीसंघर्ष बालक दोघे रा. साठेनगर धाराशिव ता. जि. धाराशिव असे सागिंतले. त्यांचे कडे केबल बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरची केबल वायर ही पोलीस ठाणे तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग व पोलीस ठाणे तामलवाडी हद्दीतुन चोरी केली असल्याची सांगीतले. पथकाने दोन पंचा समक्ष आरोपी नामे- विशाल शाम जाधव, वय 20 वर्षे, व विधीसंघर्ष बालक दोघे रा. साठेनगर ता. जि. धाराशिव यांचे ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील केबल वायर व मोटरसायकल असे एकुण 71,660 ₹ किंमतीचा माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस हावलदार- दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, पोलीस नाईक-अशोक ढगारे, पोलीस अंमलदार- योगेश कोळी, चालक पोह/ विजय घुगे यांच्या पथकाने केली आहे.