लातूरातील ‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याला आमदार गायकवाड देणार बैलजोडी

Spread the love

शेतकरी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

बुलढाणा : लातूर जिल्ह्यातील हाडोळती (ता. अहमदपूर) येथील अंबादास गोविंद पवार या ७६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याकडे शेतातील मशागतीसाठी बैलजोडी नसल्याने ते आणि त्यांची वृद्ध पत्नी स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन शेतात बैलासारखे काबाडकष्ट करत होते. या शेतकरी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘त्या’ कष्टकरी वृद्ध दाम्पत्याला बैलजोडी भेट देणार असल्याचे जाहीर केले.

आमदार गायकवाड यांनी हाडोळती या गावातील शेतकरी अंबादास पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. त्यांना शेतीच्या कामासाठी बैलजोडी भेट म्हणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे विकत घेतली जाणारी बैलजोडी ही शेतकरी अंबादास पवार यांनी त्यांच्या पसंतीने निवडायची आहे. शनिवार ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता हाडोळती (जि. लातूर) गावी जाऊन संजय गायकवाड हे स्वतः बैलजोडी त्या गरजू शेतकऱ्याला देणार आहेत. यासोबतच, शेतीसाठी लागणारी आवश्यक अवजारेही ते देणार आहेत.

‘मी स्वतः खांद्यावर जोतं घेऊन शेतीत कामे केली आहेत’

“मी सुद्धा अशा प्रसंगातून गेलो आहे. एका बैल आकस्मिकपणे मेल्यानंतर मी स्वतः खांद्यावर जोतं घेऊन शेतीत कामे केली आहेत. म्हणूनच वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांचं दुःख मला खूप जवळचं वाटतं,” अशी भावना आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर धाराशिव – केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत…

    तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

    Spread the love

    Spread the loveआधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *