
पोलिसांचं ‘स्वातंत्र्य’ बनतंय गुन्हेगारांचं संकट – एसपी रितू खोखर यांच्या शैलीची झलक
धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या पाच मोटरसायकलींसह एका आरोपीला अटक करून धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत अमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मस्सा (ता. कळंब) येथे छापा टाकला. त्यात महादेव उर्फ गगन अरुण शिंदे (वय २२) या इसमास ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या ताब्यातून येरमाळा, ढोकी, तामलवाडी, आनंदनगर (धाराशिव) व कर्नाटकातील बादलकोट येथून चोरी केलेल्या ५ मोटरसायकली (किंमत ₹२.६० लाख) जप्त करण्यात आल्या आहेत.
या संपूर्ण कामगिरीत पो.ह. जानराव, वाघमारे, पो.ना. जाधवर, पो.अं. कोळी, चालक पो.ह. अरब, पो.अं. दहीहंडे व बोईनवाड आदींचा सहभाग होता.