
धाराशिव (प्रतिनिधी) – 05 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 08 वा. 30 मि. आषाढी एकादशी निमित्त विठुरायाला साकडे घालण्यासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे पालखी सोहळ्याचा अनोखा देखावा स्कूल मधील मुला मुलींनी अतिशय देखण्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने सादर केला. सुरुवात स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याचे आयोजन करून विठुरायाचे पूजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमांमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी पालखीतील वारकऱ्यांची प्रतिकृती साकार केली आणि विठुरायाच्या जयघोषाने पालखीचे आगमन देखील करण्यात आले त्यामुळे पूर्ण स्कूलमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर वारकरी बनलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या तालावरती टाळ तसेच फुगडी चा देखील देखावा सादर करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने पालक वर्ग तसेच स्कूलमधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, तसेच इतर कर्मचारी, वर्ग, बस ड्रायव्हर, दीदी, देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर, उप प्राचार्य श्री. निलेश जाधव सर, व्यवस्थापकीय अधिकारी, श्री जीवन कुलकर्णी सर, वरिष्ठ समन्वयक श्री. प्रभाकर चौधरी सर, कार्यक्रमाधिकारी श्री. दिपक अंकुश सर, यांच्या समवेत पोदार इंटरनॅशनल स्कूल धाराशिव चे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूलचे कार्यक्रमाधिकारी श्री. दिपक अंकुश सर यांनी केले.