
पुणे येथे रेल्वेस्टेशन परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली. यामुळे धाराशिव येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने गुरुवार दि. 10/07/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले व या घटनेचा निषेध करण्यात आला व आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना निवेदन देण्यात आले. यापूढे कोणत्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. आरोपी विरुध्द कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे राज्य उपाध्यक्ष गुंडू पवार, जिल्हाध्यक्ष ॲड अजय वाघाळे, ॲड तस्लीम काझी, सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड, सिध्देश्वर बेलुरे, मतदार जनजागरण गणेश वाघमारे, बलभीम कांबळे, प्रविण जगताप, पत्रकार हुंकार बनसोडे, अ.ना. उबाळे, प्रदिप पांढरे, धनंजय वाघमारे, संपत शिंदे, ॲङ अनुरथ नागटिळक, राजेंद्र धावारे, राऊत, एस.के. इंगळे, ॲङ ए.एम. जाधव, बुबासाहेब जाधव (स्वातंत्र्य सैनिक), सुरेश शेळके, रमाकांत हाजगुडे इत्यादींची उपस्थिती होती.