
तुळजापूर – : महाराष्ट्र राज्याचे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
नितेश राणे सध्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असून मुंबईहून धाराशिवला येथे आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी तुळजापूर येथे येऊन श्रीतुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन दौऱ्यास सुरुवात केली.
यावेळी मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. यानंतर मंत्री मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी धाराशिवला रवाना झाले.