
धाराशिव – 10 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 08 वा. 30 मि. गुरुपौर्णिमे च्या निमित्ताने पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे गुरुचे महत्व अधोरेखित करणारे सादरीकरण विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सुनियोजित अशा पद्धतीने स्कूल मधील मुला मुलींनी केले. स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमांमध्ये गुरुची वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी प्रतिकृती देखील साकारण्यात आली. यातून गुरु विषयी असणारी विद्यार्थ्यांची आत्मियता प्रकर्षाने जाणवत होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन स्कूलच्या शिक्षिका आयेशा मोमीन मॅडम यांनी केले. सध्याच्या युगामध्ये देखील गुरु हा किती महत्त्वाचा आहे हे यातून दिसून आले. शेवटी स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मीक समाजाचे सर यांनी गुरु विषयी आपले मत विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यामध्ये त्यांनी आधुनिक काळातील गुरु आणि आजच्या युगातील गुरु यांच्यातील समन्वय विद्यार्थ्यांसमोर आपल्या विचारातून सादर केला.
याप्रसंगी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर, उप प्राचार्य श्री. निलेश जाधव सर, व्यवस्थापकीय अधिकारी, श्री जीवन कुलकर्णी सर, वरिष्ठ समन्वयक श्री. प्रभाकर चौधरी सर, कार्यक्रमाधिकारी श्री. दिपक अंकुश सर, यांच्या समवेत पोदार इंटरनॅशनल स्कूल धाराशिव चे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.