मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई

Spread the love

तुळजापूर – : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबाबत मंदिर संस्थान कडून मागील महिन्यात काही पुजाऱ्यांना कारवाईचा इशारा देऊन नोटीस देण्यात आल्या होत्या. या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थान कडून प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे.
नोटीस बजावण्यात आलेल्या पुजाऱ्यांपैकी 6 जणांनी नोटिशीची दखल घेऊन आपला माफीनामा सादर केला होता. त्यांच्यावर 1 महिन्याची प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
खुलासा सादर केला (1 महिना बंदी) :

  1. लखन रोहिदास भोसले
  2. अक्षय किशोर कदम-भैय्ये
  3. विशाल हनुमंत चव्हाण
  4. धीरज राजू चोपदार
  5. वैभव खुशालराव भोसले
  6. राहुल हनुमंत पवार

याशिवाय 2 जणांनी नोटिशीला कोणतेही उत्तर न दिल्याने त्यांच्यावर 3 महिने प्रवेशबंदी ची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
कोणताही खुलासा सादर केला नाही (3 महिने बंदी) :

  1. विशाल दादासाहेब मगर
  2. विशाल बाळासाहेब गंगणे

संबंधित पुजाऱ्यांना अशोभनीय व मंदिराचे शिस्तीस बाधा आणणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण करणारे वर्तन करण्यास जबाबदार ठरवण्यात आले आहे. ही कारवाई देऊळ कवायत कायदा 1909 कलम 24 व 25 नुसार करण्यात आलेली आहे.

  • Related Posts

    तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    Spread the love

    Spread the loveशेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत…

    धाराशिव कृषी विभागातील काही कार्यालयांतील कारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मनोज दगडू जाधव यांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव जिल्ह्यात युरिया खत वितरणातील कथित अनियमितता, फवारणी किट खरेदी-वितरण प्रक्रियेमधील गैरव्यवहार तसेच कृषी विभागातील काही कार्यालयांतील कारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *