
मुंबई, – महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ ची सुरुवात आज मुंबईतील विधानसभेत राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या गजरात झाली.
या उद्घाटन सत्रास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री आणि विधानसभेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याच्या भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रभक्तिपूर्ण वातावरणात झाली.