आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्रशाला शाळा, वाघोली येथे पारंपरिक वारकरी दिंडी उत्साहात साजरी

Spread the love

वाघोली – आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जिल्हा परिषद प्रशाला शाळा, वाघोली येथे भक्तिभावाने पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत टाळ, मृदंग व अभंगगायनाच्या गजरात उत्साहाने सहभाग घेतला.

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात गावातील रस्त्यांवरून पांडुरंगाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी रंगवलेल्या फुलांनी व पताकांनी पालखीची सुंदर सजावट केली होती. ग्रामस्थ व पालकांनीही या भक्तिमय उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

मुख्याध्यापक उद्धव माने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, “वारकरी संप्रदायातून मिळणाऱ्या सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने ही दिंडी आयोजित केली आहे.”

कार्यक्रमाची सांगता हरिपाठ व अभंग गायनाने झाली. यावेळी माने यु.सी, कवडे एस.एम, एलगुडे एस.एन, धाबेकर आर.एच, शिंदे डी.एस. खडबडे पी.एस, माळी.एस.टी. चव्हाण.पी.आर, पूनम काकडे यांचा समावेश होता. पालकवर्गाने देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने हा उत्सव संस्मरणीय ठरला.

  • Related Posts

    कल्याणसागरचा माजी विद्यार्थी उत्कर्षचे नीट व जेईई परीक्षेत उत्तुंग दुहेरी यश!‘नीटचे 656 गुण तर जेईई मध्ये 99.40 पर्सेंटाईल’

    Spread the love

    Spread the loveपरंडा:- कल्याणसागर समुहातील परंडा येथील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी उत्कर्ष गजानन कोठावळे याने नीट (NEET) आणि जेईई (JEE) या राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही अत्यंत…

    उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची बैठक संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. २ जून २०२६) दुपारी १२.३० वाजता के. टी. पाटील डी. फार्मसी कॉलेज येथे उत्साहपूर्ण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *