राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सहकुटुंब घेतले श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन

Spread the love

तुळजापूर -: राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज श्रीतुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेऊन भवानीमातेची पूजा केली. वस्त्रोद्योग मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनास आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेने सर्वकाही दिलेले असून मातेचा आशीर्वाद नेहमी सोबत रहावा अशी भावना व्यक्त केली.
यावेळी मंदिर संस्थान कडून तहसीलदार तुळजापूर तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवाणी मंदिर संस्थान अरविंद बोळंगे यांनी महावस्त्रे व देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी आरती वाकुरे, मंदिर संस्थान चे सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, लेखापाल तेजस कराळे, जनसंपर्क अधिकारी गणेश निरवळ, प्रशांत जाधव व मंदिर संस्थान चे इतर कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    अधिक मास व उन्हाळी सुट्टीनिमित्त तुळजाभवानी मंदिरातील पूजेच्या वेळेत बदल

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी पूजेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *