
राज्यात ३० जिल्ह्यात विमानवाहतूक सुविधा वाढवणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय वाहतूक मंत्रालय लवकरच उडान यात्री कॅफे सुरू करणार : केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू
मुंबई -: भारताला मेरीटाईम पॉवर बनवणारा वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ होणार आहे त्याचप्रमाणे ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत बनवणार असून जो मुंबईतील तिसरा एअरपोर्ट असेल याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आणि धावपट्टीची सुविधा आहे आगामी कालावधीत 30 जिल्ह्यामध्ये या सुविधा वाढवत आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हॉटेल ताज लँडस एंड बांद्रा, मुंबई येथे केंद्रीय नागरी हवाई मंत्रालय मार्फत आयोजित वेस्टन रीजन मिनिस्टर कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,गोवाचे पर्यटन मंत्री रोहन कुंटे,गुजरातचे नागरी हवाई मंत्री बलवंत सिंग राजपूत,मध्य प्रदेशचे वाहतूक परिवहन मंत्री उदय प्रताप सिंग,केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाचे सचिव समिर कुमार सिन्हा उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत ही जगात सर्वात वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था आहे. जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे.भारताला विकासाकडे नेणारी रोबोस्ट एव्हिएशन इकोसिस्टीमची अत्यंत आवश्यकता आहे. काही वर्षापर्यंत विमान सेवा हा फक्त केंद्रांचाच विषय आहे असं वाटत होते पण आता परिस्थिती बदलली आहे. जे राज्य विमान वाहतूक हा विषय प्राधान्याने बघणार नाही ते प्रगतीत मागे पडेल त्यामुळे हा विषय सर्वांसाठीच महत्वाचा ठरला आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राज्यात ग्रीन फील्ड आणि ग्राउंड फिल्ड विमान वाहतुकीला पूरक अशी सर्व सुविधा तयार करत आहोत.यासाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही तयार आहोत. भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल या प्रगतीच्या वाटेमध्ये विमान वाहतुकीचा मोठा वाटा असेल.राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आणि धावपट्टीची सुविधा आहे. या सुविधा आगामी कालावधीत 30 जिल्ह्यामध्ये वाढवत आहोत. धावपट्ट्या अजून अपग्रेड करत आहोत.रात्री विमान उतरवण्याची सुविधा निर्माण करणे. एक एअरपोर्ट उद्योजकांना व गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतो.गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये नवीन एअरपोर्ट बनवणार आहोत त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला आहे. गडचिरोली मध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे यामध्ये वाढ होऊन ती दहा लाख कोटी पर्यंत वाढेल अशा मला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई एअरपोर्टचे काम 90 च्या दशकामध्ये सुरू झाले. या कामाला विविध परवानगींची आवश्यकता होती. या विविध परवानगी घेण्यासाठी पंधरा वर्षे लागल्या त्या सात परवानग्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकाचवेळी दिल्या.नवी मुंबई एअरपोर्ट आम्ही लवकर सुरू करत आहोत. या एअरपोर्ट आणि अटल सेतूमुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रगतीला हातभार लागणार आहे. मुंबईपेक्षा तिपटीने मोठी असलेली मुंबई या परिसरात वसणार आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनोमी राज्य बनवणार आहोत. त्याचबरोबर वाढवण बंदराचा परिसर येथे १.५ ट्रिलियन अर्थव्यवस्था उभी राहील.महाराष्ट्रात विमानक्षेत्रातील उद्योजकांचे स्वागत आहे.दहिसर येथील रडारचे हलवावे जेणेकरून येथील परिसरातील अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल.त्याचप्रमाणे डीएननगर येथील ट्रान्समिशन पॉवर शिफ्ट करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. *केंद्रीय वाहतूक मंत्रालय लवकरच उडान यात्री कॅफे सुरू करणार : केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू* केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू म्हणाले की, विमान वाहतूक क्षेत्रात केंद्र व राज्य यांच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमणार असून केंद्र शासन लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले 'उडान यात्री कॅफे' सुरू करणार आहे.सर्व सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय घेत आहे असे मत केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू सांगितले. केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू म्हणाले की,'उडान यात्री कॅफे'मुळे सर्वसामान्यांना परवडणा-या दरात जेवण मिळावे यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्र,गोवा,गुजरात,मध्यप्रदेश,दमण,दीव,दादरा नगर हवेली पश्चीम क्षेत्रीय प्रदेशात ३०० दिवस पुर्ण प्रकाश उपलब्ध असतो.या राज्यांनी विमान वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकतात.केंद्र शासनाकडून लागणा-या विविध परवानग्या आणि तत्सम सर्व सहकार्य राज्यांना करण्यात येत आहे. राज्यांकडून विमान वाहतूक क्षेत्रात केलेल्या विविध प्रस्तावावर केंद्र शासन नेहमीच सकारात्मक राहीले आहे.एक नविन विमानतळ सुरू झाले सभोवती असणा-या परिसराच्या विकासाला चालना मिळेल.देशात जास्तीत जास्त विमानसेवा सुरू करून कनेक्टीव्हीटी वाढवण्यावर आमचा भर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. *विमान वाहतूक सेवा अधिक गतीमान करणे हे केंद्र शासनाचे ध्येय : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ* केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्व सामान्य व्यक्तींचे विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उडाण योजना राबविण्यात येत आहे.केंद्र व राज्याच्या समन्वयातून पश्चीम क्षेत्रातील राज्यांचे विमान वाहतूक क्षेत्रातील प्रश्न प्राधान्याने सोडवून विमान वाहतूक सेवा अधिक गतीमान करणे हे केंद्र शासनाचे ध्येय आहे.राज्यातील विमान वाहतूकीसाठी केंद्र शासन विविध योजना राबवत आहे. *गोवा राज्याने विमानवाहतूक क्षेत्रात पर्यटनामुळेच चांगली भरारी : पर्यटन मंत्री रोहन खुंटे* गोवाचे पर्यटन मंत्री रोहन खुंटे म्हणाले की, हा उपक्रम एक जबाबदारी आहे. अनेक राज्यांना जोडण्याचे काम यामार्फत होणार आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी विमानवाहतूक व या क्षेत्रात काम करण्यास वाव आहे. गोवा हे छोटे शहर जरी असले तरी अनेक पर्यटकांचे आकर्षण आहे.गोवा राज्याने विमानवाहतूक क्षेत्रात पर्यटनामुळेच चांगली भरारी घेतली आहे असेही ते म्हणाले. *नवीन प्रयोग देशभरात चर्चेत : मध्य प्रदेशचे वाहतूक परिवहन मंत्री उदय प्रताप सिंग* मध्यप्रदेशचे परिवहन मंत्री उदय प्रताप सिंग म्हणाले की, केंद्राच्या धोरणांमुळे प्रगतीला नवे वाव मिळाले असून, केहरी उडाण योजनेतूनही सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. विभागीय योजनांमुळे परिघीय विकास झपाट्याने वाढत आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी नविन विमानतळ : उद्योगमंत्री बलवंतसिंह राजपूत
गुजरातचे उद्योगमंत्री बलवंतसिंह राजपूत म्हणाले, गुजरातची विकास यात्रा मोठ्या प्रमाणात प्रगती पथावर आहे. केंद्रातील उड्डाण कार्यात गुजरात राज्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी नविन विमानतळ उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाचे सचिव समिर कुमार सिन्हा यांनी केले.यावेळी विमानसेवा कालावधीत आपत्कालीन प्रशिक्षण विषयक भारतीय विमानपत्तन प्राधीकरण तर्फे लिखीत ‘फुल स्केल एर्मजन्सी मॉक ड्रील्स प्रिपेंरिंग एअरपोर्टस फॉर दि अनएक्सपेक्टेड’या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.