अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी घेतले श्री. आई तुळजाभवानी देवींचे दर्शन

Spread the love

तुळजापूर – प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री आणि सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या निवेदिका प्राजक्ता माळी यांनी आज सायंकाळी सहकुटुंब कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. माळी कुटुंबीयांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची ओटी भरत पारंपरिक धार्मिक कुलधर्म कुलाचार केले.
प्राजक्ता माळी यांनी स्वदेस, पावनखिंड, चंद्रमुखी, फुलवंती यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्या एक कुशल निवेदिका आणि संवेदनशील कवयित्री म्हणूनही सर्वांना परिचित आहेत.
मंदिर संस्थानच्या वतीने श्री आई तुळजाभवानी देवींची प्रतिमा, कवड्याची माळ व महावस्त्र भेट देऊन प्राजक्ता माळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, अतुल भालेराव, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, ऋषभ रेहपांडे, दीपक शेळके, श्रीकांत पवार व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    अधिक मास व उन्हाळी सुट्टीनिमित्त तुळजाभवानी मंदिरातील पूजेच्या वेळेत बदल

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी पूजेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *