श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी कर्नाटकातील भाविकाकडून 5 तोळे सोने अर्पण

Spread the love

तुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील रहिवासी असलेले देवेंद्र मुचलांब्रे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह आज पहाटे श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. दर्शनाच्या वेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ५० ग्रॅम म्हणजेच ५ तोळे सोने श्रद्धेने अर्पण केले.
अर्पण केलेल्या मध्ये एक सोन्याची साखळी (चेन) व दोन लहान सोन्याचे डोळे समाविष्ट आहेत. मुचलांब्रे कुटुंब हे निस्सीम देवी भक्त असून ते नियमितपणे देवीच्या दर्शनासाठी येत असतात. देवीच्या दर्शनानंतर त्यांना आत्मिक समाधान मिळते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या श्रद्धाभक्तीची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मुचलांब्रे कुटुंबीयांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, विश्वास कदम, सहायक जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर, धार्मिक विभागाचे लिपिक राकेश पवार तसेच मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    अधिक मास व उन्हाळी सुट्टीनिमित्त तुळजाभवानी मंदिरातील पूजेच्या वेळेत बदल

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी पूजेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *