
दक्षिण आफ्रिकेत एका सोन्याच्या खाणीत शेकडो मजूर अडकल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय. बऱ्याच काळापासून ही खाण बंद होती. या खाणीत अनधिकृतरित्या खाणकाम सुरू असताना ही दुर्घटना घडलीय. खाणीतील मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 100 पेक्षा जास्त मजूरांचा भुकेमुळे तडफडून मृत्यू झालाय. तर अद्याप 500 पेक्षा जास्त मजूर अडकून पडले आहेत.