
धाराशिव – शाहूनगर, काकडे प्लॉट धाराशिव येथील रहिवासी सचिन विजयकुमार सर्जे (वय ३८) यांचे आज दुपारी छत्रपती संभाजीनगर-सोलापूर हायवेवरील एमआयडीसी परिसरात, ओ वन हॉटेलसमोर असलेल्या उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुर्दैवी निधन झाले.
आज सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसामुळे दृष्यमानता कमी झाल्याने आणि अपघात उड्डाणपुलावर झाल्याने काही वेळ कोणाच्या लक्षात न आल्याने त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
सचिन सर्जे यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले (एक मुलगा व एक मुलगी), आई-वडील, एक भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. जिल्हा न्यायालयातील वकील अॅड. बालाजी सर्जे यांचे ते बंधू होते,तर बेंबळी पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी असलेले रविकांत जगताप यांचे ते मेहुणे होते, त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण परिसरात व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.