
पुणे – वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यात राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. जयंत नारळीकर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे वाराणसी येथील हिंदू विद्यापीठात गणित शाखेचे प्रमुख होते. तर त्यांच्या आई मंगला यादेखील गणिततज्ञ म्हणून ओळखले जात. जयंत नारळीकर यांना खगोलशास्त्रात रस असायचा. सामान्य माणसाला खगोलशास्त्र अवगत व्हावे यासाठी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत.
अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया ही त्यांची विज्ञानविषयक पुस्तकं आहेत. गेली अनेक वर्षे ते खगोलशास्त्रात संशोधनाचे काम करत होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण अशा पुरस्कारांनी त्यांना वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. डॉ जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!