
धाराशिव (प्रतिनिधी) – भारताचे माजी पंतप्रधान, काँग्रेस पक्षाचे सुसंस्कृत नेते डॉ.मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले असून आज शुक्रवार, दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्याला उजाळा दिला.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सयाजीराव देशमुख, सरचिटणीस अशोक बनसोडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, माजी गटनेता सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, प्रभाकर लोंढे, प्रेमानंद सपकाळ, सुरेखा जगदाळे मॅडम, सुनील बडुरकर, कानिफनाथ देवकुळे, गोरोबा झेंडे, संजय गजधने, अभिमान पेठे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावंड, शहराध्यक्ष स्वप्नील शिंगाडे, सचिन धाकतोडे, महादेव पेठे उपस्थित होते.