भारताच्या अर्थकारणाला दिशा देणारा व देशाला जागतिक पातळीवर उंचीवर नेणारा नेता हरपला- डॉ.प्रतापसिंह पाटील

Spread the love

1990 ते 2010 या दोन दशकांमध्ये भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली.भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री व पंतप्रधान असताना मोठी गती दिली.त्यासोबतच मनरेगा योजना,आधार कार्ड योजना,आरटीई ऍक्ट,शिक्षणाचा अधिकार कायदा,मंगलयान मिशन,चांद्रयान – १ अशा अनेक योजना व मोहिमा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राबवल्या

त्यातच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग व तत्कालीन देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांनी केलेली संपूर्ण कर्जमाफी हा निर्णय देखील त्यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा निर्णय आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती आणणारा होता या सर्व निर्णयामुळे डॉ.मनमोहन सिंग हे लाडके पंतप्रधान म्हणून शेतकऱ्यात ही लोकप्रिय झाले होते. अशा महान नेत्याचे 92 व्या वर्षी निधन झाले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी दिली आहे.

  • Related Posts

    धाराशिव –  सचिन सर्जे यांचे अपघाती निधन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  – शाहूनगर, काकडे प्लॉट धाराशिव येथील रहिवासी सचिन विजयकुमार सर्जे (वय ३८) यांचे आज दुपारी छत्रपती संभाजीनगर-सोलापूर हायवेवरील एमआयडीसी परिसरात, ओ वन हॉटेलसमोर असलेल्या उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने…

    खगोलशास्त्रज्ञ , लेखक डॉ.जयंत नारळीकर यांचे निधन…

    Spread the love

    Spread the love पुणे – वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यात राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. जयंत नारळीकर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे वाराणसी येथील हिंदू विद्यापीठात गणित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *