माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस

Spread the love

मुंबई, 26 डिसेंबर भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.

  • Related Posts

    धाराशिव –  सचिन सर्जे यांचे अपघाती निधन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  – शाहूनगर, काकडे प्लॉट धाराशिव येथील रहिवासी सचिन विजयकुमार सर्जे (वय ३८) यांचे आज दुपारी छत्रपती संभाजीनगर-सोलापूर हायवेवरील एमआयडीसी परिसरात, ओ वन हॉटेलसमोर असलेल्या उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने…

    खगोलशास्त्रज्ञ , लेखक डॉ.जयंत नारळीकर यांचे निधन…

    Spread the love

    Spread the love पुणे – वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यात राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. जयंत नारळीकर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे वाराणसी येथील हिंदू विद्यापीठात गणित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *