राज्यभरात २२ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, मुंबईत तीन नवे उपायुक्त

Spread the love

मुंबई : राज्यभरात पोलीस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत मुंबईला तीन नवे पोलीस आयुक्त मिळाले आहेत. गृहविभागाकडून याबाबतचे आदेश गुरूवारी जारी केले.
राज्यात इतरत्र कार्यरत असलेल्या तीन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. त्यात राकेश ओला, राजतिलक रोशन व समीर शेख या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाचे उपायुक्त मंगेश शिंदे यांची नागपूर लोहमार्ग पोलीस येथे बदली करण्यात आली आहे. त्याशिवाय सोमनाथ घार्गे यांची पोलीस अधीक्षक (अहिल्या नगर), आंचल दलाल यांची पोलीस अधीक्षक (रायगड), महेंद्र पंडित यांची पोलीस उपायुक्त (ठाणे शहर), योगेश गुप्ता पोलीस अधीक्षक (कोल्हापूर), बच्चन सिंह यांची समादेशक (राज्यराखीव पोलीस दल, नागपूर), अर्चिंत चांडक यांची पोलीस अधीक्षक (अकोला), बाळासाहेब पाटील यांची पोलीस अधीक्षक (नाशिक,ग्रामीण), यतीश देशमुख यांची पोलीस अधीक्षक (पालघर), सौरभ अगरवाल यांची पोलीस अधीक्षक (सीआयडी,पुणे, मोहन दहिकर यांची पोलीस अधीक्षक (सिंधुदुर्ग), विश्व पानसरे यांची समादेशक (राज्य राखीव पोलीस दल, अमरावती, निलेश तांबे यांची पोलीस अधीक्षक (बुलढाणा), तुषार दोषी यांची पोलीस अधीक्षक (सातारा), सोमय मुंडे यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ (छत्रपती संभाजीनगर), जयंत मीना यांची पोलीस अधीक्षक (लातूर), नितीन बगाटे यांची पोलीस अधीक्षक (रत्नागिरी) व रितु खोकर यांची पोलीस अधीक्षक (धाराशीव) येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय संजय वाय. जाधव यांचीही बदली करण्यात आली आहे. त्याच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    रेल्वेच्या विभागीय समितीच्या पुणे येथील बैठकीत धाराशिव, बार्शी, लातूर व मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या

    Spread the love

    Spread the loveपुणे  – रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीस रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री धरम वीर मीना, खासदार डॉ. सुप्रिया…

    विजेची वाढती गरज भागवण्यासाठी ‘पवन ऊर्जा'(Wind Energy) ठरणार गेमचेंजर

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला होतेय 5 गिगावॅट पवन ऊर्जा निर्मिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जन (Net Zero Emission) करण्याचे लक्ष्य ठेवले असून 26…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *