
तुळजापूर -: श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मद्यपान करून गोंधळ घालत तोडफोड करणाऱ्या अनुप कदम यांच्यावर मंदिर संस्थान ने कडक कारवाई करत 3 वर्षांची मंदिर प्रवेशबंदी केली आहे.
मंदिर संस्थान ने गैरवर्तनामुळे नोटीस दिल्याचा राग मनात धरून अनुप कदम यांनी मद्यपान करून मंदिर संस्थान कार्यालायमध्ये येऊन तहसीलदार तथा व्यवस्थापक यांच्या नावे शिवीगाळ करत, धक्काबुक्की करत काचेची तोडफोड केली होती. या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याशिवाय 12 मे रोजीच्या मंदिर संस्थान कडून आलेल्या कारणे दाखवा नोटीशीला कोणतेही उत्तर अनुप कदम यांनी दिले नाही.
या सर्व बाबी विचारात घेऊन मंदिर संस्थानने सुरक्षा रक्षकांशी वाद घालणे, शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे, तुळजाभवानी मंदिर संस्थान च्या मालमत्तेचे नुकसान करणे हे सर्व वर्तन अतिशय गंभीर स्वरूपाचे असून पुजारी व्यवसायास न शोभणारे असल्याचे स्पष्ट करत सदर प्रकरणी जबाबदार धरून देऊळ कवायत कायदा कलम 24 व 25 अन्वये पुढील 3 वर्षांकरिता मंदिर प्रवेशबंदीचा आदेश पारित करत कडक कारवाई केली आहे.