श्री.आई तुळजाभवानी मंदिरात कडक सुरक्षाव्यवस्था; भाविकांची कसून तपासणी

Spread the love

तुळजापूर – राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री.आई तुळजाभवानी मंदिरात भाविकांची वाढती गर्दी पाहता आणि अलीकडील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. देशभरातून हजारो भाविक दररोज श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येथे येत असतात, त्यांच्या सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाने अधिक दक्षता घेतली आहे.
मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पर्स, बॅग व तत्सम वस्तू घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी कोणतेही सामान मंदिर परिसरात आणू नये, असे स्पष्ट आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तसेच, मंदिरात प्रवेश करताना प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टर व डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (DFMD) च्या सहाय्याने कसून तपासणी करण्यात येत आहे. भाविकांनी संयम बाळगून सुरक्षाव्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Related Posts

    रेल्वेच्या विभागीय समितीच्या पुणे येथील बैठकीत धाराशिव, बार्शी, लातूर व मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या

    Spread the love

    Spread the loveपुणे  – रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीस रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री धरम वीर मीना, खासदार डॉ. सुप्रिया…

    विजेची वाढती गरज भागवण्यासाठी ‘पवन ऊर्जा'(Wind Energy) ठरणार गेमचेंजर

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला होतेय 5 गिगावॅट पवन ऊर्जा निर्मिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जन (Net Zero Emission) करण्याचे लक्ष्य ठेवले असून 26…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *