धाराशिव रेल्वे स्थानक व धाराशिव तुळजापूर सोलापूर नवीन रेल्वे मार्ग चा ओमराजे निंबाळकर यांच्याकडून आढावा

Spread the love

धाराशिव – धाराशिव ( उस्मानाबाद) रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले असून, केंद्र सरकार व रेल्वे विभागाकडून “धाराशिव” हे नाव अधिकृतपणे वापरण्यास मान्यता मिळावी यासाठी कार्यवाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अटल अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा व धाराशिव तुळजापूर सोलापूर नवीन रेल्वे मार्ग चा आढावा

घेण्यासाठी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आज रेल्वे स्थानक येथे बैठक घेतली या बैठकीच्या वेळी त्यांनी स्थानकाच्या कामाचा दर्जा उच्च राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. कामांची नियमित तपासणी करण्यात यावी आणि अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा तसेच धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाचे काम: डिसेंबर 2027 पर्यंत काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा असून, मार्गावरील अडथळे टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाईपलाइन, अंडरपास, रस्त्यांचे नियोजन करावे व नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग – जागीरदार वाडी: नागरिकांनी अपुऱ्या रस्त्यामुळे होणाऱ्या अडचणी निदर्शनास आणल्यानंतर, अन्नपाची निर्माण करून मार्ग सुकर करण्याबाबत आदेश देण्यात आले. धाराशिव-लातूर रेल्वे मार्गावरील अंडरपास: सिमेंट रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने, त्याची तात्काळ तपासणी करून सुधारणा करावी. कुमाळवाडी-गड देवदरी रस्ता (मुख्यमंत्री ग्राम सडक योजना): रेल्वे विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राअभावी अर्धवट राहिलेले काम त्वरित पूर्ण करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश. गोडाऊन शेडचे काम – धाराशिव स्थानक: सध्या सुरू असलेले 100 मीटर गोडाऊन अपुरे ठरण्याची शक्यता असून, 300 मीटर लांबीचे नवीन गोडाऊन उभारण्यासाठी प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले बार्शी तालुका – कासारवाडी व घारीपुरी अंडरपास: पावसाळ्यात पाण्याची साठवणूक होऊन दळणवळणात अडथळे निर्माण होतात. यावर उपाय म्हणून सिमेंट नाली बांधण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस आमदार कैलास पाटील शैलेन्द्र परिहार मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अंशुमाली कुमार अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) प्रदीप बानसोडे उपमुख्य अभियंता (Dy.CE) मुख्य अभियंता, बांधकाम विभाग (CE, Const.) योगेश पाटील – वरिष्ठ विभागीय व्यापारी व्यवस्थापक अवधोष मीणा – वरिष्ठ विभागीय अभियंता, सेंट्रल रेल्वे या अधिकाऱ्यांसह दरेल्वे स्थानक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सूचना गांभीर्याने घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिले.

  • Related Posts

    रेल्वेच्या विभागीय समितीच्या पुणे येथील बैठकीत धाराशिव, बार्शी, लातूर व मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या

    Spread the love

    Spread the loveपुणे  – रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीस रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री धरम वीर मीना, खासदार डॉ. सुप्रिया…

    विजेची वाढती गरज भागवण्यासाठी ‘पवन ऊर्जा'(Wind Energy) ठरणार गेमचेंजर

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला होतेय 5 गिगावॅट पवन ऊर्जा निर्मिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जन (Net Zero Emission) करण्याचे लक्ष्य ठेवले असून 26…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *