
धाराशिव (प्रतिनिधी) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने धाराशिव शहरात पोलिसांनी रूट मार्च काढला. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. हा रुट मार्च धाराशिव पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत संपन्न झाला.रूट मार्चचा मार्ग पोलीस स्टेशन येथून निघून कलेक्टर बंगला,त्रिशरण चौक,सिव्हील हॉस्पीटल समोरुन,मारवाडी गल्ली,काळा मारुती चौक, पोस्ट ऑफीस, शहर पोलीस स्टेशन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक असा होता.या रुट मार्चद्वारे पोलिसांनी शहरातील मिरवणुक मार्गावर उपस्थिती दर्शवली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली. शहरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून,शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला आहे.या रूट मार्चच्या आयोजनामुळे धाराशिव शहरात सणाच्या उत्साहासोबतच सुरक्षिततेचे वातावरणही निर्माण झाले आहे.