लातूरमध्ये पत्रकारांचे घरकुलांचे स्वप्न होणार साकार!

Spread the love

लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची झाली नोंदणी; लवकरच कार्यकारिणी निवड

लातूर : लातूर शहरात पत्रकारांच्या घरकुलांचे स्वप्न अखेर साकार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून महाराष्ट्रात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थेची नोंदणी पूर्णत्वास गेली आहे. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी प्रक्रिया आज अखेर पूर्ण झाली. संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून लवकरच (Journalists Ghalkul) गृहनिर्माण संस्था कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सर्वेसर्वा नरसिंह घोणे यांनी दिली.

लातूरचा नावलौकिक देश परदेशात करणारे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या बाभळगाव या जन्मभूमीत पत्रकारांच्या घरकुलांचे स्वप्न साकार होत आहे. महाराष्ट्रात जिल्हास्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात पत्रकारांसाठी घरकुले निर्माण करणारी ही एकमेव व राज्यातील पहिलीच गृहनिर्माण संस्था ठरणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांचे नेते नरसिंह घोणे यांच्या नेतृत्वाखाली 2019-20 यावर्षी (Journalists Ghalkul) पत्रकार गृहनिर्माणसाठी बाभळगाव येथील गट नंबर 18 आणि 41 येथे जागेची खरेदी करण्यात आली.

लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या., गट नं. १८ आणि ४१, मौजे बाभळगाव, एन.ए.नं.२०२४/जेएमबी-१/डेस्क-१/लातूर/सीआर-४८ दि.१४/०३/२०२४, प्लॉट नंबर ०१ ते ०२, नविन रिंग रोड, सारोळा- बाभळगाव रोड, बाभळगाव, ही संस्था नोंदणी क्रमांक एलटीआर/एलटीआर/एचएसजी (टीओ)/१४७६/२०२५, दिनांक :- ०४/०४/२०२५ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र नियम क्रमांक XXIV) कलम ९ (१) आणि कलम १५४ (ब) (२) अन्वये नोंदविण्यात आली आहे.

नियोजित लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण संस्थेची वसाहत (Journalists Ghalkul) पूर्ण करण्यासाठी संस्था कार्यकारिणी निवड करण्यात येणार आहे. कार्यकारिणी निवड झाल्यानंतर गृहनिर्माण कार्याच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जाहीर करण्यात येणार असल्याचे या संस्थेचे सर्वेसर्वा नरसिंह घोणे  सांगितले.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *