आर. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये स्पर्धापरीक्षा तयारीसाठी कार्यशाळा संपन्न!

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, गडपाटी धाराशिव येथील, आर. पी.औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांमध्ये, संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रतापसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रातील तसेच इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी फार्मसी क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षेविषयी माहिती दिली. या कार्यशाळेसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून GDC क्लासेस नवी दिल्ली व लातूर ब्रांचेसचे हेड श्री. रुपेश चौरे यांनी विद्यार्थ्यांना भारतातील औषध निर्माणक्षेत्रातील तसेच जागतिक स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा विषय ओळख करून विद्यार्थ्यांनी त्यासाठी कशी तयारी करावी यासाठी सखोल व विस्तृत असे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये औषधनिर्माण क्षेत्रातील तसेच बौद्धिक स्तरावरील एक परीक्षाही घेण्यात आली. या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी माने संजीवनी द्वितीय क्रमांक कुमारी सानिया कोबरु व तृतीय क्रमांक कु.किशोर भिसे यांनी पटकावला या विद्यार्थ्यांना GDC क्लासेस तर्फे स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शक उपयुक्त पुस्तक संच बक्षीस म्हणून देण्यात आला. या कार्यशाळेसाठी आर पी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील बी.फार्मसी प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक म्हणून प्रा. विद्या माळी, प्रा. रोहिणी निकम व सर्व प्राध्यापक, प्राध्यापक इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

  • Related Posts

    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन न झाल्याने बेमुदत कामबंद अंदोलन

    Spread the love

    Spread the loveजिल्हाधिकारी अधिकारी यांना निवेदन धाराशिव : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन न झाल्याने बेमुदत कामबंद अंदोलन , जिल्हाधिकारी यांना महासंघाच्या वतीने…

    गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Spread the love

    Spread the loveदेशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल- केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा. शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर – सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *