
धाराशिव – निक्षय आठवड्यानिमित्त शासकीय परिचर्या महाविद्यालय,धाराशिव येथे ३ मार्च २०२५ रोजी क्षयरोग जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि महाविद्यालय प्राचार्य एस.बी.मुजावर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेमध्ये जीएनएमम आणि एएनएम अभ्यासक्रमाच्या प्रथम ते तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.निशा दळवी, स्नेहल चिंचोली स्नेहल माने प्रज्ञा,वैष्णवी घोडके,आशा वाडकर,तनुजा जाधव, रुकसार पठाण,कविता राठोड,समीक्षा भालेराव,आकांक्षा पवार,निकिता जगदाळे, श्रुती माळी,सुप्रिया शिंदे,नाझिया मुंडे, मानसी भोरे,शिवानी जाधव,अंजली गाडे, रुकसार पठाण,अनुष्का ढोबळे,हर्षदा सौंदळे,प्रणिता लांडगे,सुहानी लंगडे, शहनाज सय्यद,रुद्राक्षी माळी यांसह अनेक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
विद्यार्थिनींनी साकारलेल्या कलात्मक आणि प्रबोधनपर रांगोळ्यांद्वारे क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आली.उपस्थित मान्यवरांनी या रांगोळ्यांचे निरीक्षण करून त्यांचे कौतुक केले. स्पर्धेतील उत्कृष्ट रांगोळींसाठी विजेत्यांना येत्या २४ मार्च २०२५ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पारितोषिक देण्यात येणार आहे.