
जिल्हाधिकारी अधिकारी यांना निवेदन
धाराशिव : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन न झाल्याने बेमुदत कामबंद अंदोलन , जिल्हाधिकारी यांना महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यामध्ये आरोग्य उपकेंद्र, प्रा. आ. केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच प्रशासकिय स्तरावर विविध संवर्गनिहाय अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अभियानातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन दरमहा १ तारखेस अदा करणेबाबत मार्गदर्शक सुचना आहेत. अभियानातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना मिळणारे वेतन अतिशय तुटपुंजे स्वरुपातील असून सदर अत्यल्प मानधनावर घर प्रपंच भागवावा लागतो. माहे नोव्हेंबर २०२४ हे निधी आभावी विलंबाने होत आहे. कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी সবাचा-यांवरच अवलंबन असल्याने व वेतन विलंबाने होत असल्याने अतिशय सिधारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच त्यांच्या पश्चात कटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी साहेव यांना दिलेल्या निवेदनाबाबत प्रत्यक्ष सकारात्मक चर्चा झाली होती. परंतु अद्यापही वेतन झालेले नाही. तीन महिने विलंबाने वेतन न झाल्याने कर्मचा-यांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तरी पुनःश्च विनंती आहे कि, दिनांक २६ एप्रिल २०२५ अखेर पर्यंत तीन महिन्याचे वेतन (माहे फेब्रुवारी, मार्च व एप्रिल २०२५) अदा करण्यात यावे व यापुढे देखील दरमहा १ तारखेस वेतन अभिकर्मचा-यांच्या खातेवर जमा करण्यात यावे अन्यथा नाईलाजास्तव अभियानातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचारी दिनांक २४ एप्रिल २०२५ बेमुदत कामबंद अंदोलन करतील असे निवेदन दिले होते मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने दिनांक 28 एप्रिल रोजी पुन्हा निवेदन देण्यात आले आहे व त्यामध्ये दि. 29 पासून काम बंद करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर किरण बारकुल ,किरण तानवडे ,जीवन कुलकर्णी ,संतोष कोरपे, सतीश गिरी ,संजय मुळे ,पवार योगेश ,सुनील भुयोरे ,पाटील एस.एच, शरद हिंगमिरे, शेख के.एम माने एस एस , अशोक चव्हाण व शिवकर पी.आर. यांच्या सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.