धाराशिवमध्ये शासकीय आयुर्वेद रुग्णालयात जेरियाट्रिक ओपीडीची सुरुवात

Spread the love

धाराशिव – वृद्धापकाळाशी संबंधित व्याधींच्या उपचारासाठी शासकीय आयुर्वेद रुग्णालय,धाराशिव येथे विशेष जेरियाट्रिक ओपीडी सुरू करण्यात आली आहे.मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या ‘१०० दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात आला आहे.यामुळे ६० वर्षांवरील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार आणि तज्ज्ञ सल्ला मिळणार आहे.

भारतात आयुर्मान वाढत असल्याने वृद्धापकाळातील आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. संधिवात,मधुमेह,उच्च रक्तदाब, बद्धकोष्ठता,अशक्तपणा यांसारख्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरू शकतात.जेरियाट्रिक ओपीडीद्वारे वृद्धांना नियमित आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि जीवनशैली सल्ला देण्यात येत आहे.

सामान्य आरोग्य तपासणी आणि सल्ला,मधुमेह,उच्च रक्तदाब, संधिवात,अशक्तपणा यावर आयुर्वेदिक उपचार,पक्षाघात, कंपवात (Parkinson’s), स्मृतीभ्रंश, निद्रानाश यांसारख्या गंभीर विकारांवर उपचार,आयुर्वेदिक औषधे – अश्वगंधा,शतावरी,गुग्गुळ, आमलकी यांचा समावेश,आहार आणि जीवनशैली सल्ला – वात दोष संतुलित करण्यासाठी मार्गदर्शन, नियमित फॉलो-अप आणि पुनरावलोकन सेवा

वृद्धत्वामुळे शरीरात वात दोष वाढतो, ज्यामुळे सांधेदुखी,अशक्तपणा, झोपेचे विकार आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. आयुर्वेदात योग्य आहार, औषधोपचार आणि पंचकर्म उपचारांद्वारे या समस्यांवर उपाय सुचवले आहेत.यामुळे वृद्धावस्थेतही सुदृढ आरोग्य राखता येऊ शकते.

धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात जेरियाट्रिक ओपीडी सुरू झाल्यापासून २३६ हून अधिक वृद्ध रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य सुधारण्याची संधी मिळत आहे.भविष्यात या ओपीडीचा व्यापक विस्तार करण्याची योजना रुग्णालय प्रशासनाने आखली आहे.

ही सुविधा वृद्धांसाठी नवे आशेचे किरण ठरत असून,आयुर्वेदाच्या मदतीने ते अधिक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतात. धाराशिवमध्ये सुरू झालेला हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरू शकतो,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिष्ठाता डॉ.गंगासागरे यांच्या मार्गदर्शनाखाली कायचिकित्सा विभागाच्या माध्यमातून प्रभारी विभाग प्रमुख वैद्य विनायक पाचे आणि सहाय्यक प्राध्यापक वैद्य विलास बोरसे यांच्या देखरेखीखाली या प यशस्वी संचालन होत आहे. अधिष्ठाता डॉ.गंगासागरे यांनी जिल्ह्यातील सर्व वृद्ध नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आयुर्वेदाच्या मदतीने निरोगी व सुदृढ जीवनशैली अंगीकारावी,असे आवाहन केले आहे.” आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आयुर्वेद वृद्धापकाळात देखील निरोगी व आनंदी जीवनशैली राखण्यासाठी आयुर्वेद हे सर्वोत्तम साधन आहे.

धाराशिव येथील जेरियाट्रिक ओपीडी हा वृद्धांच्या आरोग्यासाठी आशेचा किरण ठरत असून,या उपक्रमामुळे आयुर्वेदाच्या प्रचार – प्रसाराला नवे बळ मिळत आहे .

वृद्धापकाळाशी संबंधित व्याधींच्या उपचारासाठी शासकीय आयुर्वेद रुग्णालय,धाराशिव येथे विशेष जेरियाट्रिक ओपीडी सुरु करण्यात आली आहे.मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या निर्देशानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

भारतातील आयुर्मानात झालेली प्रचंड वाढ ही वृद्धापकाळातील चिंतेची बाब बनत आहे . वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक समस्यांसाठी आयुर्वेद प्रभावी उपाय प्रदान करू शकतो.जेरियाट्रिक ओपीडी अंतर्गत ६० वर्षे व त्यावरील रुग्णांना आयुर्वेदिक उपचार व सल्ला उपलब्ध करुन दिला जात आहे .

  • Related Posts

    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन न झाल्याने बेमुदत कामबंद अंदोलन

    Spread the love

    Spread the loveजिल्हाधिकारी अधिकारी यांना निवेदन धाराशिव : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन न झाल्याने बेमुदत कामबंद अंदोलन , जिल्हाधिकारी यांना महासंघाच्या वतीने…

    गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Spread the love

    Spread the loveदेशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल- केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा. शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर – सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *