आई तुळजाभवानीच्या गर्भगृहासह मंदिर दुरुस्ती कार्यक्रम १५ दिवसात निश्चित होणार.

Spread the love

मंत्री शेलार यांच्या बैठकीत निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर जिर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. मंदिराच्या गाभार्‍यातील फरशी व मुलामा दिलेला भाग काढल्यानंतर मंदिराचे शिखर ज्या ४ दगडी तुळईवर उभारण्यात आले आहे त्यापैकी २ शिळांना आरपार तडे गेल्याची बाब समोर आली. या अनुषंगाने मंदिराचे संरचनात्मक परीक्षण( स्ट्रक्चरल ऑडिट )करण्याच्या अनुषंगाने ही बाब आपण पुरातत्व विभागाच्या निदर्शनास आणून दिली. पुढील पंधरवड्यात गाभाऱ्यासह मंदिर दुरुस्तीचा कार्यक्रम निश्चित करण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बोलावलेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

शुक्रवारी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशिष शेलार साहेब यांच्या मंत्रालयातील दालनात श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. साडेतीन शक्तीपीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान असणाऱ्या पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचा आढावा घेण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यातील दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मंदिराचे संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून घेण्यात आले होते. त्याचा अहवालही समोर आला आहे. गर्भगृहासह मंदिराची दुरुस्ती करताना दगडांना नंबर टाकून पूर्ण वास्तू उतरवून परत एकदा तेच दगड वापरत नव्याने जुन्या पद्धतीत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा नव्याने साकारला जाणार जाणार आहे. या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य मंत्री ना.आशिषजी शेलार यांना बैठक घेण्याबाबत आपण विनंती केली होती .त्यानुसार शुक्रवारी मंत्रीमहोदयांनी या महत्वाच्या विषयावर आपल्या विनंतीला मान देऊन बैठक घेतली. यावेळी पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, उपसचिव श्रीमती नंदा राऊत, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहने, सल्लागार आफळे आदी उपस्थित होते.

विश्वस्त, पुजारी, अभ्यासक यांचीही होणार बैठक
सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीत तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून मंदिराचा कळस ज्या ४ दगडी तुळईवर स्थित आहे, त्यापैकी दोन शिळांना पूर्णता तडे गेल्याचे आपण मंत्री ना. शेलार यांच्या निदर्शनास आणून दिले. गाभाऱ्याची दुरुस्ती करताना तुळजाभवानी देवीच्या मुख्य मूर्तीला धोका संभावु शकतो. त्यामुळे श्री तुळजाभवानी देवीजीची मूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने इतरत्र हलविणे आवश्यक आहे. त्यासाठी मंदिराचे प्रमुख व धार्मिक प्रमुख यांची बैठक घेण्याचे ठरले. तसेच दैनंदिन धार्मिक विधिबाबत धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, मंदिराचे पुजारी, मंदिर संस्थानचे विश्वस्त व पुरातत्व विभागाचे अधिकारी यांचीही बैठक घेण्याचे ठरले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

  • Related Posts

    रेल्वेच्या विभागीय समितीच्या पुणे येथील बैठकीत धाराशिव, बार्शी, लातूर व मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या

    Spread the love

    Spread the loveपुणे  – रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीस रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री धरम वीर मीना, खासदार डॉ. सुप्रिया…

    विजेची वाढती गरज भागवण्यासाठी ‘पवन ऊर्जा'(Wind Energy) ठरणार गेमचेंजर

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला होतेय 5 गिगावॅट पवन ऊर्जा निर्मिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जन (Net Zero Emission) करण्याचे लक्ष्य ठेवले असून 26…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *