महिला पोलीस नाईक लोखंडे यांना डॉ.एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – दिल्ली येथील बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकॅदमीच्यावतीने देण्यात येणारा डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार – २०२५ धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे वितरण गोवा येथील पाटृॊ बस स्थानका जवळील आर्ट आणि कला विभाग संस्कृती भवन पंजिम येथे दि.१६ फेब्रुवारी रोजी गोव्याचे माजी मुख्यमंत्री चंद्रकांत कवलेकर यांच्या हस्ते हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सिने अभिनेते झाकीर खान, नागपूर विद्यापीठाचे माजी उप कुलगुरू डॉ एस एन पठाण, अकॅदमीचे अध्यक्ष डॉ. एन.एस. खोबा, डॉ. संदीप खोचर, प्रदेशाध्यक्ष प्रथमेश अबनवे, प्रा.डॉ. बी.एन. खरात, प्रा गोरख साठे, पपेतल्ला रविकांत, महेंद्र सिंग, धनंजय डांगळे आदींसह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल लोखंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *