कुष्ठरोग शोध मोहिमेची केंद्रीय पथकाकडून तपासणी

Spread the love

धाराशिव –  जिल्ह्यात ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ग्रामीण व शहरी जोखीमग्रस्त भागात कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक १२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात दाखल झाले.

केंद्रीय पथकात भारत सरकारच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ.सुधीर वंजे आणि विशेष तज्ञ डॉ. सपना (CLTRI,चेंगलपट्टू) यांचा समावेश होता.तसेच राज्यस्तरीय आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. दिगंबर कानगुले आणि औद्योगिक पर्यवेक्षक श्री.मिलिंद तोडीवाले उपस्थित होते.

या पथकाने तुळजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, तामलवाडी आणि मसला खुर्द येथे पाहणी केली.तसेच कळंब तालुक्यातील येरमाळा,चोराखळी, उपळाई,हासेगाव आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,कळंब येथे भेट देऊन मोहिमेच्या कार्यपद्धतीची तपासणी केली.

१३ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनय कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे यांची उपस्थिती होती.सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.मारुती कोरे यांनी मोहिमेचे सादरीकरण केले.
यानंतर,केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची भेट घेऊन मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केले.

  • Related Posts

    जागतिक परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिर व रुग्णसेविकांचा गौरव,सुरक्षा समिती,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवचा स्तुत्य उपक्रम.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील सुरक्षा समितीच्या वतीने जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रुग्णसेविकांचा…

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वार्डाची सुरक्षा समिती सदस्यांकडून पाहणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे उष्माघात वार्ड पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आला आहे. रुग्णांना तातडीने व योग्य उपचार मिळावेत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *