
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील श्री सिद्धिविनायक परिवार या संस्थेने २०२४-२५ या गळीत हंगामात १ लाख ५७ हजार मेट्रिक टन ऊसाचे यशस्वी गाळप करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संस्थेच्या माध्यमातून दोन ऊस कारखाने जिल्ह्यात यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
ह्या हंगामाच्या सांगता समारंभाचे आयोजन संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. कार्यक्रमात बोलताना कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याची ग्वाही दिली आणि जानेवारी महिन्यापर्यंतच्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे सांगितले.
श्री सिद्धिविनायक परिवार नेहमीच शेतकरी हितासाठी प्रयत्नशील असतो आणि भविष्यातही अधिक चांगले काम करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे संस्थेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या कार्यक्रमात व्यंकटेश कोरे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, रामचंद्र सारडे, धनंजय गुंड, मंगेश कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, बालाजी जमाले, अभयसिंह शिंदे, प्रदीप धोंगडे यांच्यासह कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार आणि वाहन मालक उपस्थित होते.