वडगाव एमआयडीसीमध्ये गुंतवणुकीसाठी उद्योजक उत्सुक

Spread the love

आपण केलेल्या आवाहनाला ९४ उद्योजकांनी दिला प्रतिसाद : आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव या जिल्हा मुख्यालयापासून अगदी जवळ असलेल्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव एमआयडीसीत ८० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी अंदाजे १५० एकरचा औद्योगिक वापर करण्यात येणार आहे. यात ७५ एकर जमिनीवर मध्यम,लघु व सूक्ष्म उद्योग (MSME) पार्क उभारण्याचे तत्वतः ठरले आहे. या पार्कमध्ये गुंतवणूक करून ज्यांना माध्यम,लघु व सुक्ष्म उद्योग उभे करायचे आहेत अशा इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांकडे नोंदणी करावी असे आवाहन आपण २८ जानेवारी रोजी केले होते त्यानुसार आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा आणि परिसरातील तब्बल ९४ उद्योजकांनी नोंदणी करून वडगाव एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयारी दर्शविली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी वडगाव सिद्धेश्वर येथील औद्योगिक क्षेत्रात होऊ घातलेल्या ‘एमएसएमई पार्क’ संदर्भात धाराशिव येथील लघुउद्योग भारती या औद्योगिक संघटनेच्या समन्वयाने उद्योजकांसोबत लघु व सूक्ष्म उद्योग स्थापनेविषयी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली झाली. या बैठकीस मोठ्या संख्येने धाराशिवसह इतर जिल्ह्यातील उद्योजकही उपस्थित होते. यावेळी वडगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योग उभारणीकरिता अनुदान, सहाय्य, भूखंडाच्या वाटप पद्धती, पायाभूत सुविधांकरिता आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ९४ उद्योजकांनी वडगाव एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने उत्स्फूर्तपणे तयारी दर्शविली आहे.२०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात लघु,सुक्ष्म व मध्यम उद्योजकांना २० कोटीपर्यंतच्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. प्रथमच व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना व महिलांना केंद्र सरकार यामाध्यमातून २ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. लघु, सूक्ष्म व मध्यम औद्योगिक पार्क उभारणीसाठी एमआयडीसीकडून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी ४६ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सदर निधी उपलब्ध होण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.

धाराशिव येथील लघुउद्योग भारतीने लघु, सूक्ष्म आणि मध्यम औद्योगिक क्षेत्राबाबत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना व वडगाव औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारल्याने मिळणारे फायदे अधिकाधिक उद्योजकांना माहीत करून देता यावेत यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे अशी सूचना उपस्थित पदाधिकाऱ्यांना केली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे,अमित शिंदे,लघुउद्योग भारती मराठवाडा विभागाचे सहसचिव प्रवीण काळे, लघुउद्योग भारती धाराशिवचे अध्यक्ष राजाभाऊ कोंढारे, एमआयडीसीच्या वतीने खाडे व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने घोडके. संजय देशमाने.निशांत होनमुटे. कुमार स्वामी. विकास बेलुरे. प्रशांत कुलकर्णी, गजानन मसलेकर. संजय शेटे यांची उपस्थिती होती.

  • Related Posts

    धाराशिव जिल्ह्यातील खवा बाजार पेठेवर अन्न व भेसळ आयुक्त  तुकाराम मुंढेच्या आदेशानुसार कारवाईने खळबळ :येरमाळा येथे तब्बल २१५ किलो खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/येरमाळा:-धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत कळंब तालुक्यातील येरमाळा येथुन तब्बल २१५किलो संशयित खवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे…

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा सलग चार वर्षे अव्वल

    Spread the love

    Spread the love६२२ महिला उद्योजिकांची ऐतिहासिक भरारी धाराशिव दि.१५ एप्रिल (जिमाका) कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास हा केवळ शेतीवर आधारित नसून,त्या भागातील युवक-युवतींना मिळणाऱ्या उद्योग व रोजगार संधींवर अवलंबून असतो.हेच सूत्र…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *