
नळदुर्ग (प्रतिनिधी) – पल्लवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग परिसरातील महिलांसाठी लोकमान्य सार्वजनिक वाचनालय येते फॅशन डिझाइनिंग व आरी वर्क प्रशिक्षण कालावधी 1 जानेवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 आयोजन केले आहे या प्रशिक्षणामध्ये आरी वर्क डिझाईन, यमरोडी डिझाईन, जर जुदी तसेच फॅशन डिझाईन यामध्ये महिलांचे कपड्याचे सर्व प्रकार इत्यादी विषयावरती प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत चालू आहे. याचबरोबर महिलांचा व्यक्तिमत्व विकास व विक्री ,मार्केटिंग, बाजारपेठ याविषयी महिलांना मार्गदर्शन होणे गरजेचे असते या अनुषंगाने दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी लोकमान्य वाचनालय नळदुर्ग येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.अशोक चव्हाण व्याख्याते मुंबई , त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश नावडे सर, पल्लवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री दगडू पवार, उपाध्यक्ष श्री सतीश चव्हाण सचिव सौ.ज्योती पवार मॅडम तसेच संस्थेचे सदस्य बाबू राठोड याचबरोबर अक्षरवेल गटाचे अध्यक्ष शांता ठाकूर व सचिव शिल्पा पुदाले याचबरोबर प्रशिक्षिका ज्योती पवार मॅडम व प्रशिक्षण घेणाऱ्या 50 महिला उपस्थित होत्या,तसेच हे प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी नळदुर्ग येथील लोकमान्य सार्वजनिक वाचनालय यांची जागा प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री बंडू पुदाले , किरण पाटील, नाईक साहेब यांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.