
धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ शिल्पा डोमकुंडवार यांची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसंचालक पदी नियुक्ती
तर धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून उदगीरचे डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांची नियुक्ती
धाराशिव :- धाराशिव येथे 10 फेब्रुवारी 2022 पासून कार्यरत असलेल्या डॉ शिल्पा डोमकुंडवार यांची संदर्भातील शासन आदेश अन्वये सरळ सेवेमधून नियुक्ती करण्यात आली होती आता
प्रशासकीय कारणास्तव लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे कार्यरत असणारे डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांची उस्मानाबाद धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शिल्पा डोमकुंडवार या उस्मानाबाद धाराशिव येथून बदली होऊन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसंचालक म्हणून माननीय शिल्पा डोमकूंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवाशी असलेले डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांची धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ते मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी अधिष्ठाता डोमकुंडवार मॅडम यांच्याकडून प्रभार स्वीकारण्याची शक्यता आहे अधिष्ठाता डॉक्टर शैलेंद्र चव्हाण हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होते यांचे मूळ गाव उदगीर हे असून डॉक्टर चव्हाण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे उदगीर येथीलच श्यामलाल विद्यालयात झालेले असून यापुढील शिक्षण अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे एमबीबीएस व एमडी पर्यंत शिक्षण झालेले आहे डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर पंधरा वर्षे सलग सेवा केलेली आहे तसेच या 15 वर्षे सेवेनंतर त्यांनी सलग सात वर्ष लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कामगिरी केलेली आहे या सर्व केलेल्या सेवेचा उपयोग डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांना उस्मानाबाद धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून कामाला येणार आहे डॉक्टर शिल्पा डोमकुंडवार या प्रशासन पदावर यांचा अजिबात अंकुश राहिलेला नव्हता असेही कर्मचाऱ्यांमधून दबक्या आवाजात बोलले जात होते आणि विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड आरोग्य अंतर रुग्णालयातील अस्वच्छता तसेच रुग्णावर लक्ष न देणे इत्यादी कारणास्तव डॉक्टर दोन कुंडवार यांची कारकीर्द वादात होती आणि कर्मचारीही लक्ष न देण्याच्या व प्रशासकीय यंत्रणेवर अंकुश न ठेवण्याच्या भूमिकेवर नाराज होते अखेर डॉक्टर शिल्पा डोमकुंडवार
या अधिष्ठाता म्हणून डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांना प्रशासकीय यंत्रणेवर अंकुश ठेवणे स्वच्छतेवर लक्ष ठेवणे कामचुकार कर्मचाऱ्यांवर वचक ठेवणे तसेच परिसरातील फिरणाऱ्या बेवारस व व्यसनाधीन दारुड्या लोकांवर ही अंकुश ठेवणे या व इतर बाबीचे डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांच्यावर मोठे आव्हान असणार आहे हे आव्हान डॉक्टर चव्हाण हे सक्षमपणे पेलतील अशी अपेक्षा तसेच या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून तळ ठोकून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील अंकुश ठेवणे मोठे आव्हान असणार आहे डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांना हे आव्हान सक्षम पेलण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा जनतेकडून देण्यात येत आहे
.