धाराशिव – कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष अँड.निलेश हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
या बैठकीत गायरान जमिनीवर चारा लागवड करणे, प्रधानमंत्री पिक विमा योजना कंपनीच्या प्रतिनिधीचे नाव व मोबाईल क्रमांक ग्रामपंचायतस्तरावर प्रसिद्ध करणे,शेतीच्या बांधावर जैविक प्रयोगशाळेची उभारणी करणे,जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्प राबविणे तसेच शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा पुरविणे,कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमालाचे किमान आधारभूत मूल्य फलक दर्शनी भागावर लावणे, कौशल्य विकास कार्यक्रमास ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्धी देणे,महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळअंतर्गत असलेल्या कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना व उपक्रम राबविणे,महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत खते व इतर कृषीविषयक उत्पन्नाबाबत,मुलांना शिक्षणाची सोय,स्पर्धा परीक्षा वाचनालय व शाळेमध्ये पटांगणाची सुविधा कृषीच्या व इतर योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास केलेल्या कार्यवाहीचा आढावा,सावकारीचे प्रकरणे,खरीप हंगाम कर्ज वाटप, वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे नुकसान व मोबदला,अन्नसुरक्षा व पुरवठा विभागाच्या शेतकऱ्यासंबंधी योजना,आदिवासी विकास विभागाच्या शेतकऱ्यांसंबंधी योजना व प्रधानमंत्री कृषी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत आढावा बैठक घेणार आहे.या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.