सर्व सोयाबीनची खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरु ठेवावे आमदार कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी

Spread the love

धाराशिव – जिल्हयातील नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालु ठेवावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

धाराशिव जिल्हयात चार लाख ,62 हजार 872 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. त्यामुळे सोयाबीनचे सरासरी उत्पादन 16.98 क्विंटल एवढे झाले असुन एकुण उत्पादकता 78 लाख 59 हजार 566 क्विंटल पर्यंत झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात 35 हजार 400 शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नाव नोंदणी केली होती. त्यापैकी दहा डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 रोजी एकूण नऊ हजार 380 शेतकऱ्यांची खरेदी झाली आहे. एकुण दोन 41 हजार क्विंटल सोयाबीनचे खरेदी झालेली आहे. म्हणजे जवळपास नाव नोंदलेल्या 25 हजार शेतकऱ्यांची अद्यापपर्यंत खरेदी होणे बाकी आहे. सध्या खरेदी केंद्रावर दोन – दोन किलोमिटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. खरेदी केंद्र चालकाकडून कडता, चाळणी या नावाखाली सोयाबीन खरेदीची मुदत संपत असल्यामुळे शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. केंद्र सरकारने खरेदीला मुदतवाढ देताना राजस्थानसाठी 14 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली परंतु महाराष्ट्रातील खरेदी केंद्राला फक्त 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली हा दूजाभाव का? असा प्रश्न देखील आमदार पाटील यांनी श्री. फडणवीस यांना विचारला.

धाराशिव जिल्हयातील नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालु ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

  • Related Posts

    कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर धाराशिव – केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत…

    तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

    Spread the love

    Spread the loveआधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *