नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Spread the love

धाराशिव – मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पहाणी केली. काक्रंबा येथील महादेव पाटील (यांच्या गट नं. 388) यांच्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे 00 हे 40 आर मोठे नुकसान झाले आहे. तसेच चन्नाप्पा वट्टे यांचे (गट नं. 819) टोमॅटो पिकाचे 00 हे 20 आर क्षेत्रावरील मान्सुनपुर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीची तुळजापुर तहसिलचे तहसिलदार अरविंद बोळंगे, तलाठी पाटील मॅडम, कृषी सहाय्यक कापसे यांच्या उपस्थितीत पहाणी करुन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणेबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. यावेळी चेतन बंडगर, दिपक भिसे, कार्तीक वाघमारे, कालीदास खताळ, श्रीराम मोगरकर यांच्यासह स्थानिक पत्रकार बांधव उपस्थित होते. तसेच परीसरातील शेतकरी व नागरीक यांची उपस्थिती होती.

  • Related Posts

    कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर धाराशिव – केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत…

    तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

    Spread the love

    Spread the loveआधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *