नांदेड जिल्ह्यामध्ये एकाच दोरीने गळफास घेत शेतकरी पिता पुत्राने संपविले जीवन

Spread the love

गाव.मिनकी ता. बिलोली,जि.नांदेड येथील काळजाला पिळवटून टाकणारी घटना.

उदगीर येथील एका शाळेत दहावी वर्गात शिकणारा ओमकार लक्ष्मण पैलवार नावाचा १६ वर्षाचा मुलगा संक्रांत निमित्त गावी (मिनकी) येथे आला. घरी येऊन सणानिमित्त नवीन कपडे आणि शिक्षणाचे साहित्य घेऊन देण्याची वडिलांकडे मागणी केला. वडील राजेंद्र पैलवार यांनी सध्या आपल्याकडे पैसे नाहीत, पैसे आले की तुला नवीन कपडे आणि पुस्तक वह्या घेऊन देईन असे सांगितले.

पण मुलाच्या मनात कसले विचार आले त्यालाच ठाऊक. तो सकाळी उठला सरळ शेतात गेला आणि गळफास लावून स्वतःला तिथेच संपवून घेतला..

मुलगा (ओमकार) घरी आला नाही म्हणून आई वडील भाऊ सर्वांनी शोध घ्यायला सुरुवात केली. शोधत शोधत वडील शेताकडे आले, पाहतो तर मुलगा झाडाच्या फांदीवर लटकत होता. मुलगा फाशी घेतल्याची कसलीच माहिती घरच्यांना न देता वडील लगेच झाडावर चढले, मृतदेहाला अलगद खाली सोडून, त्याला जागेवर झोपवले आणि मुलगा ज्या दोरीने फाशी घेतला त्याच दोरीने त्याच झाडावर त्याच क्षणी वडीलही फाशी घेऊन त्याच झाडाखाली स्वतःचे जीवन संपवले..

शेतमालाचे घसरते भाव, शेतीचे घटलेले उत्पन्न,शेतीवर वाढलेला उत्पादन खर्च, वाढती महागाई,यांचा ताळमेळ बसत नसल्याने पिता पुत्राने टोकाचे पाऊल उचलेले आहे.

कृषी प्रधान देशात जर शेतकऱ्यावर आपले जीवन संपवण्याची वेळ येत असेल तर या पेक्षा मोठे दुर्दैव या भारताचे नाही.

  • Related Posts

    धाराशिव –  सचिन सर्जे यांचे अपघाती निधन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  – शाहूनगर, काकडे प्लॉट धाराशिव येथील रहिवासी सचिन विजयकुमार सर्जे (वय ३८) यांचे आज दुपारी छत्रपती संभाजीनगर-सोलापूर हायवेवरील एमआयडीसी परिसरात, ओ वन हॉटेलसमोर असलेल्या उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने…

    खगोलशास्त्रज्ञ , लेखक डॉ.जयंत नारळीकर यांचे निधन…

    Spread the love

    Spread the love पुणे – वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यात राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. जयंत नारळीकर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे वाराणसी येथील हिंदू विद्यापीठात गणित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *