राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे निधन ;सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ

Spread the love

सोलापूर – राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे निधन ;सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ
सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडी मुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आले यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली.

सोलापूर महापालिकेमध्ये त्यांनी महापौर पद भूषवले महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते. महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.

  • Related Posts

    बीएलओचे काम पाहणारे शिक्षक इंगळे यांचा अपघाती मृत्यू

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व सध्या बीएलओचे कर्तव्य पार पाडणारे गोविंद इंगळे रा‌.कनगरा ता. धाराशिव (वय – ५० वर्षे)…

    आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३० तासांची झुंज यशस्वी,तेरणा नदीत बुडालेल्या अमरचा मृतदेह अखेर सापडला; तेर गावावर शोककळा..

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी…. धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबाकाका मंदिराजवळ तेरणा नदीच्या पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ३० तासांच्या अथक, समन्वयित आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर सापडला. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *