सोलापूर : डॉ. वळसंगकरांचं स्वप्न अधुरंच, खास विमान घेतलं पण… डोक्यात गोळी घालून संपवलं जीवन

Spread the love

सोलापूर : डॉ. वळसंगकरांचं स्वप्न अधुरंच, खास विमान घेतलं पण… डोक्यात गोळी घालून संपवलं जीवन

सोलापूर – शुक्रवारी रात्री सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी बातमी समोर आली. सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येनंतर त्यांना तातडीने त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या हाताखाली काम करणारे डॉक्टर आणि स्टॉफ यावेळी ढसाढसा रडले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शिरीष वळसंगकर यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं होतं. त्यांनी स्वत:चं रुग्णालय स्थापन करून हजारो रुग्णांवर आजवर उपचार केले. सोलापूर जिल्ह्यातील प्रख्यात मेंदूरोगतज्ज्ञ म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांनी मनाशी जो संकल्प केला, तो संकल्प कायम पूर्ण केला. मात्र त्यांचं एक स्वप्न मात्र अधुरंच राहिलं आहे. त्यांना विमानाने संपूर्ण जग फिरायचं होतं. जगाचा प्रवास करायचा होता. यासाठी त्यांनी खास डबल इंजिन डायमंड प्लेनदेखील खरेदी केलं होतं. जगाचा दौरा करण्याची तयारी देखील सुरू झाली होती. पण अशातच त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आहे


वळसंगकर हे त्यांचंच हॉस्पिटल होतं. याच हॉस्पिटलमध्ये ते मेंदूरोग तज्ज्ञ म्हणून काम करत होते. शुक्रवारी त्यांना या अवस्थेत पाहून संपूर्ण स्टॉप हादरून गेला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. वळसंगकर यांच्या मृत्यूमुळे डॉक्टर आणि संपूर्ण स्टॉफ ढसाढसा रडायला लागला होता. कुटुंबीयांनी देखील एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झालं असून तपास करत आहे. वळसंगकर हॉस्पिटलसमोर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. वळसंगकर हे प्रसिद्ध डॉक्टर होते, त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास करत आहे.

डॉ. शिरीष वलसंगकर यांनी सोलापूर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतलं आणि पदवी प्राप्त केली. विज्ञानाची पूर्व-पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी प्री-प्रोफेशनल परीक्षा देखील उत्तीर्ण केली. वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं. त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. ते मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधू शकत होते.

  • Related Posts

    धाराशिव –  सचिन सर्जे यांचे अपघाती निधन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  – शाहूनगर, काकडे प्लॉट धाराशिव येथील रहिवासी सचिन विजयकुमार सर्जे (वय ३८) यांचे आज दुपारी छत्रपती संभाजीनगर-सोलापूर हायवेवरील एमआयडीसी परिसरात, ओ वन हॉटेलसमोर असलेल्या उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने…

    खगोलशास्त्रज्ञ , लेखक डॉ.जयंत नारळीकर यांचे निधन…

    Spread the love

    Spread the love पुणे – वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यात राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. जयंत नारळीकर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे वाराणसी येथील हिंदू विद्यापीठात गणित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *