१० लाख रुपये भरा तरंच उपचार करू; भाजप आमदाराच्या स्वीय सहाय्यकाच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू, दोन चिमुकले जीव आई विना पोरकी

Spread the love

भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीच्या व्याकूळ वेदना होत होत्या.प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या. मात्र रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली. अनिशा भिसे यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये आत्ता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील असे सांगितले मात्र प्रशासन ऐकायला तयार नव्हतं. काही वेळानंतर पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला. मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हलायला तयार नव्हते.

अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवले गेले. त्यातच त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र प्रसूती झाल्यानंतर भिसे यांचा करुण अंत झाला.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या.

सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर सर्व सामान्य लोकांचे जगणे देखील किड्या मुंग्यांपेक्षाही वेगळे राहिले नाही का? असा सवाल सामान्य लोकांतून उपलब्ध होत आहे.

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३० तासांची झुंज यशस्वी,तेरणा नदीत बुडालेल्या अमरचा मृतदेह अखेर सापडला; तेर गावावर शोककळा..

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी…. धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबाकाका मंदिराजवळ तेरणा नदीच्या पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ३० तासांच्या अथक, समन्वयित आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर सापडला. या…

    ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

    Spread the love

    Spread the loveयावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार सुनील शिंदे, आमदार प्रसाद लाड यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *