Spread the love

एनव्हीपी शुगरचा गुढी पाडव्यानिमित्त 100 रुपयांचा दुसरा हप्ता बँक खात्यात वर्ग

शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन ऊसबिल घ्यावे – चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील

धाराशिव – एनव्हीपी शुगर प्रा.लि.जागजी कारखान्याच्या वतीने सन 2024-25 च्या प्रथम गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन 100 रुपये प्रमाणे दुसरा हप्ता गुढीपाडवा सणाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

एनव्हीपी शुगर कारखान्याने प्रथम गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, तोडणी ठेकेदार, चालक, ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने कमी कालावधीत 1 लाख 2 हजार मे.टन यशस्वी गाळप केले आहे. शेतकऱ्यांना ऊस दिल्यानंतर पंधरा दिवसांत प्रत्येक महिन्याच्या 1 व 16 तारखेला संबंधित शेतकर्‍याच्या खात्यात ऊसबिल जमा करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.

तरी ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

  • Related Posts

    युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जागतिक युवक कौशल्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार व उद्योग क्षेत्रात नवे क्षितिज खुले झाले असून, महायुती सरकारच्या रोजगाराभिमुख धोरणांचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष…

    धनेश्वरी शिक्षण समूह व पाटील कुटुंबियांचे साखर कारखानदारीत पाऊल

    Spread the love

    Spread the loveश्री लक्ष्मी नृसिंह शुगर्समध्ये आ.पाटील व डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा भागीदार म्हणून समावेश धाराशिव – परभणी तालुक्यातील तालुक्यातील आमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सचे नवे भागीदार म्हणून आ.डॉ राहुल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *