विश्वासातून प्रगतीकडे – श्री सिद्धीविनायक परिवाराचा येरमाळा येथे सीएनजी पंप सुरु

Spread the love

धाराशिव – येरमाळा येथील श्री सिद्धिविनायक परिवाराच्या पेट्रोल पंपावर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सीएनजी इंधनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते व श्री.विकास बारकुल, श्री.मदन बारकुल, श्री.खंडेराव मैंदाड यांच्या उपस्थिती मध्ये हा समारंभ पार पडला.
सीएनजी इंधनाच्या उपलब्धतेमुळे स्थानिक वाहनचालकांना स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर इंधनाचा लाभ मिळेल. श्री सिद्धिविनायक परिवाराने या नव्या सुविधेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सीएनजी इंधनाच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरण संरक्षणास हातभार लागेल. तसेच, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी अधिक किफायतशीर असल्याने वाहनचालकांच्या इंधन खर्चात बचत होईल.
सर्व सीएनजी वाहन धारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे करण्यात येत आहे.
यावेळी.मकरंद पाटील.शिवाजीराव गिड्डे पाटील.बालाजी कोरे.गणेश कामटे.धनंजय गुंड,.मंगेश कुलकर्णी.राजेश पौळ आणि परिवारातील इतर मान्यवर उपस्थित होते.

  • Related Posts

    युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जागतिक युवक कौशल्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार व उद्योग क्षेत्रात नवे क्षितिज खुले झाले असून, महायुती सरकारच्या रोजगाराभिमुख धोरणांचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष…

    धनेश्वरी शिक्षण समूह व पाटील कुटुंबियांचे साखर कारखानदारीत पाऊल

    Spread the love

    Spread the loveश्री लक्ष्मी नृसिंह शुगर्समध्ये आ.पाटील व डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा भागीदार म्हणून समावेश धाराशिव – परभणी तालुक्यातील तालुक्यातील आमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सचे नवे भागीदार म्हणून आ.डॉ राहुल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *